कर्जमाफी योजनेत वैजापूर तालुक्यात १५ हजार पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत वैजापूर तालुक्यातील १५ हजार ३५७ पात्र शेतकऱ्यांची पहिली लाभार्थी यादी जाहीर करण्यात आली आहे. कर्जमाफीच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

 राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी सुरू केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६ अंतर्गत वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. 

योजनेच्या पहिल्या टप्प्यात तालुक्यातील १५,३५७ पात्र शेतकऱ्यांची पहिली लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
वैजापूरचे सहायक निबंधक किरण चौधरी यांच्याकडे योजनेच्या लाभार्थी याद्या प्राप्त झाल्या आहेत. तालुक्यातील १६२ गावनिहाय याद्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.